Posts

Showing posts from December, 2021

सगरोळीच्या तेजस्विनी बनल्या आत्मनिर्भर : लॉकडाऊन काळात किरकोळ कामापासून सुरु झालेल्या प्रवासाचा लाखाचा पल्ला पार

Image
सगरोळीच्या तेजस्विनी बनल्या आत्मनिर्भर : लॉकडाऊन काळात किरकोळ कामापासून सुरु झालेल्या प्रवासाचा लाखाचा पल्ला पार संस्थेकडून पाच वर्षापूर्वी महिलांसाठी शिलाई प्रशिक्षण घेण्यात आले. त्यातून किरकोळ कामे करीत काही महिला एकत्र आल्या. कापूस वेचणी कोट, शालेय गणवेश आदी वस्तू तयार करणे याहेतूने पुढे प्रगती टेक्सटाइलची स्थापना करण्यात आली. मागील कोरोना काळ मात्र सर्वांसाठी अतिशय खडतर गेला. ग्रामीण भागातील व्यक्तींची आर्थिक स्थिती फारच बिकट झाली होती. संस्थेतील शिवणकाम कोर्स पूर्ण झालेल्या काही महिला एकत्र आल्या आणि हाताला काम मिळावे म्हणून अत्यल्प दरात कापडी मास्क तयार करू लागले. संस्थेच्या पाठबळावरच कृषी विज्ञान केंद्र विभागातील गृहविज्ञानशास्त्र प्रमुख डॉ. माधुरी रेवणवार आणि प्रकल्प समन्वयिका सौ. श्रद्धा देशमुख यांनी या विषयात लक्ष घालून महिला आर्थिक विकास महामंडळ व मानव विकास मिशन यांचेशी संपर्क साधत नवीन ३० मशीन व इतर साहित्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. नांदेड येथील मा. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या सहकार्याने जून २०२१ अखेर एक मोठा विभाग सुरु झाला. अवघ्या दोन महिन्या...

तेजस्विनी च्या माध्यमातून ग्रामीण महिला लघु उद्योजक व्हाव्यात : कृषि विज्ञान केद्र सगरोळी च्या तेजस्विनी गारमेंट सेंटर (C.F.C.) चे जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटणकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

Image
  तेजस्विनी च्या माध्यमातून ग्रामीण महिला लघु उद्योजक व्हाव्यात : कृषि विज्ञान केद्र सगरोळी च्या तेजस्विनी गारमेंट सेंटर (C.F.C.) चे जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटणकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न महिला बचत गटामार्फत मिळणाऱ्या संधीने प्रत्येक महिलाने आपली कौटुंबिक जबाबदारी सांभाळून आर्थिक प्रगती करावी. काळाची गरज ओळखून असा व्यवसाय निवडावा कि त्यात गटाच्या मार्फत सर्वांचे व्यक्तिगत तथा सामाजिक हित व्हावे असे मत नांदेड चे जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटणकर यांनी मांडले. ते आज मानव विकास मिशन अंतर्गत महिला विकास महामंडळ यांच्या २०१९-२० निधीद्वारे कृषि विज्ञान केंद्र संचालित तेजस्विनी गारमेंट सेंटर (Common Facility Centre) च्या उद्घाटनप्रसंगी सगरोळी येथे बोलत होते. त्यांच्या सोबत जिल्हा नियोजन अधिकारी श्री. थोरात व जिल्हा समन्वय अधिकारी, मविम श्री. चंदनसिंग राठोड ही उपस्थित होते. सगरोळी येथील CFC मध्ये २२ इलेक्ट्रिक शिलाई मशीन, ४ ओव्हर लॉक मशीन, काच बटन मशीन शिवाय कटिंग व स्किन प्रिंटींग मशीन हि ठेवण्यात आली आहे. यात गावातील शिवणकाम येणाऱ्या ३० महिलांकडून मास्क, शालेय गणवेश, कापडी प...

गंगामा मंडळ या पोषण बागेची आखणी डॉ. माधुरी रेवणवार यांनी महिलांना प्रत्यक्ष करून दाखविली

Image
  गंगामा मंडळ या पोषण बागेची आखणी डॉ. माधुरी रेवणवार यांनी महिलांना प्रत्यक्ष करून दाखविली दैनंदिन आहारामध्ये भाज्यांचे महत्व खूप जास्त आहे. बऱ्याच वेळा बाजारात भाजीपाल्याचा तुटवडा असतो. अथवा असलेल्या भाज्यांचे भाव खूप जास्त असतात. अशा वेळी सगळ्यांनाच भरपूर भाज्या खरेदी करणे शक्य नाही. म्हणूनच प्रत्तेकाच्या दारी जागेच्या उपलब्धतेनुसार भाजीपाल्याची परसबाग असावी. जेणेकरून भाजीपाल्याची कमतरता पडणार नाही. दिलेल्या शिफारसिपेक्षा भाजीपाल्याची दैनंदिन आहारात कमतरता पडल्यास जीवनसत्वे आणि खनिजांच्या अभावामुळे विविध आजार जडतात. जसे कि अ जीवनसत्वाच्या अभावामुळे डोळ्यांचे विकार, क जीवनसत्वाच्या अभावामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. तसेच त्वचेचे आणि हाडांचे आजार होतात. त्याच प्रमाणे लोहाच्या कमतरतेमुळे रक्तक्षय होतो. निरोगी जीवनासाठी भाजीपाल्याची अत्यंत गरज प्रत्तेकालाच आहे. भाजीपाल्यांमध्ये सूक्ष्म पोषकतत्वे असतात म्हणजे सर्व प्रकारची जीवनसत्वे आणि खनिजे विशेष करून लोह आणि काल्शियाम जे महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे आणि रक्तक्षय तसेच हाडांचे आजार कमी करण्यासाठी आवश्...